बोरनारच्या तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू
Bornar youth dies after drowning in Girna riverbed जळगाव : गिरणा नदीपात्रात बुडाल्याने बोरनार, ता.जळगाव येथील 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. ही घटना सोमवारी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता घडली. मंगल इघन बाविस्कर (32, रा.बोरनार, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
मंगल बाविस्कर हा तरुण जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मजुरी काम करून आपला प्रपंच भागवत होता. सोमवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी तो कामावर गेला मात्र सायंकाळी घराकडे परतत असताना गिरणा नदीला आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज त्यााला न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात आल्यानंतर गावकर्यांनी त्याचा शोध सुरू केला तसेच काही पट्टीच्या पोहणार्यांनाही बोलविले. अखेर बुधवार, 2 0 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला. मय तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.


