भुसावळातील शिवसेना उपशहरप्रमुखाचा अपघाती मृत्यू : कार चालकाविरोधात गुन्हा


Accidental death of Shiv Sena deputy head in Bhusawal : Crime against car driver भुसावळ : भुसावळातील उद्धव ठाकरे गटातील उपशहरप्रमुखाचा नशिराबादनजीक अज्ञात वाहनाच्या दिलेल्या धडकेने अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता घडली होती. या घटनेत धनराज जगन ठाकूर (35, दीनदयाल नगर, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नशिराबाद पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात दिवसानंतर कार चालक निष्पन्न
धनराज जगन ठाकूर हा तरुण ठाकरे गटाचा शिवसेना उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत होता शिवाय चहाची टपरी टाकून आपल्या कुटूंबाला हातभार लावत होता. गुरुवारी कामानिमित्त धनराज हा तरुण जळगाव येथे पल्सर दुचाकी (एम.एच.19 सी.सी.0651) ने गेल्यानंतर रात्री शहराकडे परतत असताना गोदावरी रुग्णालयाजवळ मारोती कार (एम.एच.47 ए.बी.7449) ने जबर धडक दिल्यानंतर धनराजच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला होता तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. भुसावळातील दीनदयाल नगरात ही माहिती कळताच कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला. अपघातानंतर कार चालक पसार झाला होता. सुरूवातीला नशिराबाद पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र अपघाताला कारणीभूत असलेला कार चालक निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी रात्री जगन एकनाथ ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारोती कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अलियार खान करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !