धरणगाव तालुक्यात अपघात : सतखेडागावातील वयोवृद्ध ठार
Accident in Dharangaon taluk: Elderly man of Satkhedagaon killed पिंप्री, ता.धरणगाव : हॉटेल सायली जवळील पेट्रोल पंपाजवळ एका मालवाहू छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, 21 रोजी घडला. मधुकर बाबुराव चावडे (65, रा.सतखेडा ता धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
मंगल तुंबड पाटील (59, सतखेडा, ता.धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीुसार, गुरुवार, 21 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मधुकर चावडे हे त्यांच्या हिरोहोंडा मोटारसायकल क्रमांक (एम.एच.15 ए.टी 8458) ने पिंप्री गावातून जात असताना हॉटेल सायलीजवळील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून रवींद्र देविदास बारी (हरिविठ्ठल नगर, जळगाव) या चालकाने त्याच्या ताब्यातील मालवाहू छोटा हत्ती क्रमांक (एम.एच.19-9481) ही भरधाव वेगात व हयगईने चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात मधुकर चावडे हे मोटार सायकलसह खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहेत.


