तीन हजारांची लाच भोवली : धानोर्यातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Bribe of 3000 rupees: Senior technician of power company in Dhanora in the net of Jalgaon ACB
जळगाव : शेतातील ट्यूबवेल मोटार कनेक्शन देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा येथील वरीष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (28, लक्ष्मी नगर, धानोरा) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने वीज कंपनीतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
50 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीचे नावाने देवगाव, ता.चोपडा शिवारात गट नंबर 330 मध्ये शेत आहे. या शेतात थ्री फेजचे ट्युबवेल मोटारसाठी यातील तक्रारदार यांनी वीज कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदार अनिल राठोड यांना भेटल्यानंतर 22 रोजी त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारात तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, किशोर 9महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
