जळगावातील महिला डॉक्टरांचा विनयभंग : रीक्षा चालकाला बेड्या
Woman doctor molested in Jalgaon : Rickshaw driver handcuffed जळगाव : शहरात वैद्यकीय व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या व मूळच्या बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय महिला डॉक्टरांसोबत पाच महिन्यांपासून जवळीक करीत त्यांचा मोबाईलमध्ये फोटो काढून विनयभंग करणार्या रीक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रईस (पूर्ण नाव माहित नाही, शिवाजी नगर) असे अटकेतील रीक्षा चालकाचे नाव आहे.
वेळोवेळी केला पाठलाग
संशयित रीक्षा चालक रईस याने महिला डॉक्टरांचा पाच महिन्यांपासून पाठलाग केला शिवाय जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्या मोबाईलमधे महिलेचे फोटोदेखील काढले. महिला डॉक्टरांनी याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास कॉन्स्टेबल अश्विनी इंगळे करीत आहेत.


