जळगावात रेल्वेच्या धडकेने तापी पाटबंधारे खात्यातील क्लर्कचा मृत्यू
Clerk of Tapi Irrigation Department dies after being hit by a train in Jalgaon जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने आशाबाबा कॉलनीजवळ तापी पाटबंधारे विभागातील बळीराम माधव मराठे (56, रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 23 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीत बळीराम मराठे हे वास्तव्याला होते व तापी पाटबंधारे विभागात क्लर्क म्हणून नोकरीला होते. शनिवार, 23 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक 417 जवळील 8 ते 10 च्या दरम्यान रेल्वेची धडक लागल्याने बळीराम मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती लोकोपायलट यांनी रेल्वे पोलिसांना दिली.


आरपीएफ विनोद साळवे यांच्यासह रामानंद नगर पोलिस ठाण्यातील हवालदार राजेश चव्हाण, पोलिस नाईक कालसिंग बारेला, नितेश बच्छाव, अजीज शहा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतहेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, मुलगा लोकेशन, आणि दोन मुली असा परिवार आहे.
