दुचाकी चोरटा चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief in Chalisgaon city police net चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अवघ्या तीन तासात अटक केली. चेतन संतोष पाटील (शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

चोरीनंतर तीन तासात संशयित जाळ्यात
चाळीसगाव तहसील कार्यालयासमोरून 20 रोजी सागर अजितराव देशमुख (35, लक्ष्मीनगर, परदेशी बोर्डिंग समोर, चाळीसगाव) यांची 40 हजार रुपये किमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (एम.एच.19 बी.ए.0064) चोरीला गेली होती. 22 रोजी चाळीसगाव शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता एक संशयित इसम हिरापूरकडून चाळीसगावकडे विना नंबरच्या मोटारसायकल येत असताना पोलिस नाईक महेंद्र पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गिते यांनी त्यास ताब्यात घेतले. संशयिताने चाळीसगाव तहसीलसमोरून दुचाकी चोरीला केल्याची कबुली दिली.



यांनी केली कारवाई
चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल सोनवणे, पोलिस नाईक महेंद्र पाटील, भूषण पाटील, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गीते, विजय पाटील, पवन पाटील, समाधान पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, राकेश महाजन यांनी ही कारवाई केली. तपास पोलि नाईक भूषण पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !