चाळीसगावातून चोरलेली महागडी इनोव्हा अखेर छत्रपती संभाजी नगरात सापडली

चाळीसगाव शहर पोलिसांनी मूळ मालकास सुपूर्द केली कार


The expensive Innova stolen from Chalisgaon was finally found in Chhatrapati Sambhaji Nagar चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील मुकेश बापूराव चौधरी यांच्या मालकिची महागडी इनोव्हा कार (एम.एच.19 डी.ए.2777) ही 18 डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपास सुरू असताना ही कार छत्रपती संभाजी नगरातील शहानुरमिया दर्गा परीसरात बेवारस लावल्यानंतर तेथील पोलिसांनी जप्त करीत चाळीसगाव शपोलिसांशी संपर्क साधला होता.

चाळीसगाव पोलिसांनी कार ताब्यात घेत ती मूळ मालक मुकेश चौधरी यांना सोपवली आहे. यावेळी चाळीसगाव शहरचे निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक दीपक बिरारी, हवालदार विनोद भोई, कॉन्स्टेबल अमोल पाटील आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !