कुसूंबा रायपूरला भावासह बहिणीवर चॉपरने हल्ला : दोघांना अटक


Kusumba Raipur attack on brother and sister with chopper : Both arrested जळगाव : जुन्या भांडणाचे कारण पुढे करत अनधिकृतरित्या घरात प्रवेश करत दोघांनी अश्लिल शिवीगाळ करत भावासह त्याच्या बहिणीवर चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला. सोमवार, 25 रोजी रोजी 10.30 वाजता कुसुंबा रायपूर येथे ही घटना घडली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
अजय सोनवणे हे बहिणीसह रायपूर कुसुंबा येथे वास्तव्यास आहेत. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात. सोमवारी ते घरात असताना करन चंद्रशेखर पाटील, चेतन वसंत माळी (दोन्ही रा. कुसुंबा) यांनी त्यांच्या घरात बेकायदेशीररित्या प्रवेश केला. जुने भांडणाचे कारण पुढे करत दोघांनी अजय तसेच त्यांच्या भगिणीीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दमदाटी करुन संशयितांनी चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला केला. यात अजय तसेच त्यांची भगिनी अशा दोघांना दुखापत झाली. प्रकार कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत तसेच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.



याप्रकरणी तक्रारीवरुन मंगळवार, 26 रोजी दोघा संशयितांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तपास उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !