नशिराबादनजीक भरधाव कारच्या धडकेने मामा-भाचे जखमी


Uncle-nephew injured after being hit by a speeding car near Nasirabad जळगाव : समोरुन भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवरील मामा तसेच भाचा असे दोघे जखमी झाले. 24 रोजी दुपारी 2.15 वाजता नशिराबाद टोलनाक्याच्या अलिकडे घटना घडली. याप्रकरणी मंगळवार, 26 रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात कार (क्रमांक एम.एच.16 सी.वाय.4273 वरील ) चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला.

कार चालकाविरोधात गुन्हा
गोपाल मोतीराम चव्हाण (25, मूळ रा.अंबालहावे तांडा, हल्ली मु. रामेश्वर कॉलनी) तसेच त्यांचा भाचा राधेश्याम अशोक राठोड असे दोघे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एच.0537) ने दुचाकीने जळगाव येत होते. त्याचवेळी जळगाव येथून कार (क्रमांक एम.एच.16 सी.वाय.4227) भरधाव वेगाने भुसावळकडे जाताना समोरुन दुचाकीला धडक दिली. या अपघातात गोपाल यांच्यासह राधेश्याम हे दोघे जखमी झाले े त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी मंगळवार, 26 रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अतुल महाजन करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !