जळगाव जिल्ह्यात 52 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’
‘MPDA’ on 52 criminals in Jalgaon district जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलाने वर्षभरात 52 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात केले असून खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, अत्याचार, जबरी चोरी, जातीय दंगली व विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणार्या 37 धोकादायक गुन्हेगारांवर 371 गुन्हे दाखल आहेत. वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या चार जणांवर 29 गुन्हे दाखल आहेत. हातभट्टी व्यवसाय करणार्या 11 जणांवर 114 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
वर्षभरात केलेली कारवाई
जानेवारी 2023 या महिन्यात अमळनेर दोन, भुसावळ व चाळीसगाव मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये जळगाव मधील एकावर कारवाई करण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये जळगावमधील दोन जणांवर, अमळनेर व भुसावळमधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल 23 महिन्यात चाळीसगाव, रावेर, जळगाव मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
मे 2023 या महिन्यात चोपडा, जळगाव व अमळनेर मधील प्रत्येकी एका व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.


जून 2023 महिन्यात जळगावमधील तीन जण, भुसावळ व यावलमधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
जूलै 2023 या महिन्यात भुसावळ मधील 3, अमळनेर, चाळीसगाव व जळगाव मधील प्रत्येक एक अशा 6 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
ऑगस्ट 2023 या महिन्यात जळगाव मधील 3, भुसावळ 2, अमळनेर व चोपडा मधील प्रत्येक एक अशा 7 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
सप्टेंबर 2023 या महिन्यात जळगाव मधील 6 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ऑक्टोंबर 2023 या महिन्यात जळगाव मधील 2, भुसावळ, चाळीसगाव व अमळनेर मधील प्रत्येक एक अशा 5 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
नोव्हेंबर 2023 मध्ये एरंडोल मधील एका वाळू तस्कारांवर कारवाई करण्यात आली.
डिसेंबर 2023 या महिन्यात आतापर्यंत भडगाव, यावल, जळगाव व एरंडोल मधील एका जणांविरुद्ध अशा एकूण 4 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. एक गुन्हा उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेला आहे.
गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश
जिल्ह्यात एमपीडीए दाखल गुन्हेगारांना नाशिक, औरंगाबाद, येरवडा, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर व मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आलेले आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश आहे.
