सोयगाव तालुक्यातील युवकाच्या खून प्रकरण तीन तमासगीरांना अटक : खुनाचे हे धक्कादायक कारण आले समोर !


Three spectators were arrested in the case of the murder of a youth in Soigaon taluka : the shocking reason for the murder came to light ! पाचोरा : तमाशा पाहण्यासाठी आलेल्या सोयगाव तालुक्यातील युवकाच्या खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी तमासगीरांची कसून चौकशी केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली, संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तमाशाजवळच आढळला होता मृतदेह
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे प्रेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना काही अंतरावर सोमवार, 25 रोजी सकाळी 7.42 वाजेच्या सुमारास मनोज ज्ञानेश्वर निकम (26, रा. हनुमंतखेडा ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.







नातेवाईकांचा संशय ठरला खरा
मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागत्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आल मात्र मनोज निकम याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने त्याचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मारेकर्‍यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली. अखेर 26 डिसेंबर रोजी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे सोपविण्यात आल्याने खताळ यांनी अत्यंत काटेकोरपणे तपासाला सुरूवात केली.

वाहनाचा धक्का अन युवकाचा मृत्यू
मयतावर कुठल्याच ठिकाणी घाव वगैरे मारण्यात आला नसलातरी त्याला शरीराला बसलेल्या मारमुळे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तमासगीरांची कसून चौकशी केली. तमाशा मंडळाचे वाहन हे रात्रीच्या अंधारात मागे रिव्हर्स घेतांना मनोज निकम हा वाहनाखाली आल्याचे तमासगीरांच्या लक्षात आल्याने त्यांच्या तंबूत घबराट झाली. कुणाकडे ही वाच्यता न करता त्यांनी मनोजचा मृतदेह जागेवरून उचलून बाजूला ठवला. मनोज याच्या पायाचे हाड देखील मोडल्याची माहिती समोर आली. या गुन्ह्यात आरोपी योगेश उर्फ ज्ञानेश्वर संतोष सूर्यवंशी (25, आर्वी, ता.जि.धुळे), सुनील हिरालाल गोपाळ (23, गलंगी, ता..चोपडा, जि.जळगाव) च विनोद उत्तम जोगी (26, टाकरखेडा, ता.एरंडोल, जि..जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

तीन संशयितांना पोलिस कोठडी
या आरोपींना पाचोरा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिसस कोठडी सुनावण्यात आली. तपास स्वतः पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !