जळगावातील 42 वर्षीय महिलेचा विनयभंग


जळगाव  : जळगाव शहरातील पिंप्राळा रोड भागातील 42 वर्षीय महिलेशी अश्लील भाषेत संभाषण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता घडला. याप्रकरणी गुरूवार, 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता याकुब दाऊद खान उर्फ बांगी (जळगाव) याच्याविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील शिविगाळ करीत विनयभंग
जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात 42 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवार , 22 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता महिला घरी असतांना याकुब दाउद खान उर्फ बांगी (जळगाव) हा घरी आला. काहीही कारण नसतांना तिला अश्लिल शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने गुरूवार्रें 28 डिसेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी याकुब दाऊद खान याच्या विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बालाजी बारी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !