पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : अवैध दारू वाहतूक करणार्या वाहनासह पाच लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
Big operation of Pachora State Excise Department: Impounded goods worth five lakh 20 thousand along with a vehicle transporting illegal liquor जळगाव : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणार्यांविरोधात धडक मोहीम जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू आहे.
अवैध मद्य जप्तीने खळबळ
पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी शनिवारी जामनेर-बोदवड रस्त्यावर अवैधपणे ताडी (मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच 02 एफ इ 9947 या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील 400 लिटर तयार ताडी जप्त केली. संशयित आरोपी मोहमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.


