धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील प्रौढाचा मृत्यू : पत्नीला घेण्यासाठी जाताना ओढवला प्रसंग


An adult dies in Jalgaon after falling from a running train : The incident was dragged while going to pick up his wife जळगाव : माहेरी असलेल्या पत्नीला घेण्यासाठी निघालेल्या जळगावातील पवन नगरातील 45 वर्षीय प्रौढाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शहरातील प्रतापनगर जवळ घडली. किसन गवळी (45, पवननगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

खंडवाकडे निघाल्यानंतर काळाचा घाला
शहरातील प्रजापत नगरातील पवन नगर येथे धर्मा गवळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगचे काम नोंद करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांची पत्नी खंडवा येथे माहेरी गेलेल्या असल्याने ते पत्नीला आणण्यासाठी शनिवारी सकाळी निघाले. घरापासून अवघ्या काही अंतरावरील प्रजापत नगरजवळील रेल्वे रुळावर खांबा क्रमांक 421/2बी ते 421/4बी दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले.



कर्ता हरपला : तीन पोर झाली पोरकी
नागरिकांनी धाव घेऊन तालुका पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी गंभीर जखमी झालेल्या धर्मा गवळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वेतून पडून मयत झालेल्या धर्मा गवळी यांच्या खिशात रेल्वेचे तिकीटही आढळून आले. धर्माच्या यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घालीत हिरावून घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे तीन मुले पोरकी झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !