एटीएममध्ये कॅश भरताना 65 लाखांचा अपहार : ऑडीटर कस्टोडियनसह चौकडी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात


65 lakh embezzlement while paying cash in ATM : Chaukdi along with auditor custodian caught by Chalisgaon police चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी एटीएममध्ये कॅश भरताना तब्बल 65 लाखांचा अपहार करणार्‍या कस्टोडियन, ऑडीटरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रवीण देविदास गुरव (38, पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), दीपक भिकन पवार (34, पाटणदेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), चंद्रशेखर एकनाथ गुरव (43, गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव) व राजेंद्र वाल्मीक चौधरी (58, नारायणवाडी, चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

असे आहे अपहार प्रकरण
गोरक्षनाथ पोपट डोंगरे (38, शिवशंकर सोसायटी, रुम नं. 16 पाथरवट लेन, परेन आईसक्रिमच्या मागे, पंचवटी नाशिक) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार (दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव) व ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (गुजराल पेट्रोलपंप जवळ, निवृत्तीनगर, जळगाव) यांनी संगनमताने चाळीसगाव शहरातील आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम व आयडीएफसी बँकेचे एक एटीएम असे दोन तसेच पाचोरा शहरामध्ये मनिस्पॉट एक एटीएम व आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम अशा एकूण चार एटीएम मशीनमध्ये कंपनीमार्फत बँकेने कंपनीचे नोकर असल्याने विश्वासाने रोख रक्कम टाकताना त्यात दरवेळी पूर्ण रक्कम न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकूण 64 लाख 82 हजार 200 रुपये बाजूला काढून विश्वासघात केला. माहे मे 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान हा प्रकार घडला. ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव यांची दोघांवर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी होती मात्र सिक्युर हॅल्यु इंडीया लिमीटेड या खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍यांना सहकार्य केले. दरम्यान, या गुन्ह्यात चाळीसगावातील राजेंद्र वाल्मीक चौधरी (58, नारायणवाडी, चाळीसगाव) या संशयिताने अपहारातील 14 लाखांची रोकड स्वीकारल्याने त्यासही अटक करण्यात आली.



आरोपींना 11 दिवसांची पोलिस कोठडी
65 लाखांच्या अपहार प्रकरणी अटकेतील आरोपींना 19 ते 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली असून संशयितांकडून कारसह रोकड, सोन्याचे दागिणे मिळून 19 लाख 42 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी अपहारातील काही रक्कम परीचीतांना दिल्याने त्यांना रोकड परत करण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यांनी रोकड परत केली नाही त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी केले जाणार आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, हवालदार योगेश बेलदार, महेंद्र पाटील, दीपक पाटील, उज्वलकुमार म्हस्के, ज्ञानेश्वर पाटोळे, विनोद खैरणार, आशुतोष सोनवणे, अमोल भोसले व सबा शेख यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !