दारू न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


Hotel manager assaulted out of anger over not serving liquor : Crime against both जळगाव : नाईंटी दारु मागत 500 रुपयाची नोट मद्यपीने काढली मात्र सुटे पैसे नसल्याने त्याला दारू न दिल्याच्या रागातून दोघांनी हॉटेल मॅनेजरला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 29 रोजी रात्री 10.40 वाजता खोटेनगर स्टॉपजवळ घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात शनिवार, 30 रोजी दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. दरम्यान, द्य न देता काही कारण नसताना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
सुखदेव चौधरी रात्री पर्ल-इन बियरबारमध्ये आला. नाईन्टी दारुची क्वॉटर मागत त्याने 500 रुपयांची त्यानी नोट काढल. मात्र सुटे नसल्याचे सांगत हॉटेल मॅनेजर दिनेश यानी दारु देण्यास नकार दिला. रात्री 10.40 वाजेच्या सुमारास मॅनेजर दिनेश हे खोटेनगर स्टॉपजवळ आले असता सुखदेव चौधरी तसेच प्रफुल्ल पाटील या दोघांनी दिनेश यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गुलाब पाटील (43, श्रीराम समर्थ कॉलनी) तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर असे दोघे बंधू हे भांडण सोडविण्यासाठी धावुन गेले मात्र ज्ञानेश्वर यांचे दोन्ही हात प्रफुल्ल पाटील यांनी मागुन धरुन ठेवले. सुखदेव चौधरी याने हातातील लाकडी मोगरी मारल्याने ज्ञानेश्वर यांच्या डोळ्याला दुखापत झाली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.



मॅनेजरसह तिघांविरोधात गुन्हा
दारु न दिल्याने तसेच काही एक कारण नसताना रोडवर खाली पाडून तिघांनी पायातील चपलेने तसेच बुटांनी डोक्यावर, तोंडावर, डोळ्याजवळ मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याची तक्रार सुखदेव चौधरी यांनी केल्यावरून संशयित दिनेश लाकरा, ज्ञानेश्वर पाटील, गुलाब पाटील यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अनिल मोरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !