भुसावळात प्रभू श्रीरामांच्या जयघोषात निघाली अक्षदा कलश यात्रा


भुसावळ : अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिर उद्घाटनाची तारीख अगदी जवळ आली असून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील नागरीकांना अक्षता वाटण्याचा उपक्रम सुरू आहे. भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील नागरीकांना सोहळ्यांच्या निमंत्रणासाठी अक्षदा वाटप करण्यात आल्या तसेच हजारो नागरीकांच्या सहभागाने व युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व सुहर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात कलश यात्रा काढण्यात आली.

हजारो नागरीकांचा सहभाग
भुसावळ शहरातील क्रमांक 24 मधील तुकाराम नगरातील नियोजित श्रीराम मंदिरापासून अक्षदा कलश यात्रेला मंगळवार, 9 रोजी सायंकाळी सुरूवात झाली. जागृत हनुमान, स्वामी नारायण मंदिर परीसरापर्यंत अक्षदा कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. या अक्षदा कलश यात्रेत युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व सुहर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित बर्‍हाटे यांच्यासह ज्ञानदेव पाचपांडे, रवींद्र झोपे, गणेश भारंबे, गणेश भोळे, प्रदीप चौधरी, बोंडे, विभास मुळे, प्रदीप चौधरी, एम.बी.चौधरी, एस.पी.चौधरी, भूषण पाटील, डॉ.उमेश सपकाळे, हर्षल बर्‍हाटे, विनय बर्‍हाटे, प्रदीप रळे यांच्यासह नागरीक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

प्राणप्रतिष्ठा दिनी विविध कार्यक्रम
अयोध्येत 22 जानेवारीला राम लल्लांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असून याच दिवशी शहरातील प्रभाग 24 मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील तुकाराम नगरातील विठ्ठल मंदिरात सुंदर कांड तसेच गणपती मंदिरात रात्री आठ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी चार ते आठ वाजता दरम्यान हजारो नागरीक, महिला, युवक-युवतींच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात येणार आहे तसेच एक हजार दिवे विठ्ठल मंदिर परीसरात लावण्याचे नियोजन सुमित बर्‍हाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या भागातील स्वामी नारायण मंदिरात सकाळी 11 वाजता भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


कॉपी करू नका.