कामगारांसाठी चळवळ हे तर पुण्याईचे काम : करीम सालार

शिखर संस्थेच्या माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांची अर्धी फी माफ करणार


Movement for workers is the work of Pune : Karim Salar भुसावळ : शासनाच्या गोरगरीबांसाठी मोठ्या योजना आहेत. यात शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आदींचा समावेश आहे. शिखर संस्थेने गोरगरीबांना शासकीय योजनाचे लाभ देण्यासाठी उचललेले पाऊल हे नक्कीच कौतुकास्पद असून पुण्याईचे काम आहे, खर्‍या अर्थाने संस्था ही गोरगरीबांची सेवा करीत आहे अशा शिखर संस्थेच्या माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेत बीएड, आयटीआय, डीएड यासह अन्य शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाईल व 50 टक्के फी सुद्धा माफ केली जाईल, असे प्रतिपादन जळगाव येथील इकरा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी करीम सालार यांनी येथे केले. रींग रोड नजीक असलेल्या शिखर इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये आयोजित कामगार मेळाव्यास ते बोलत होते. या कार्यक्रमात तब्बल सोळाशे कुटुंबांनी विविध शासकीय योजनेसाठी नाव नोंदणी केली.

लवकरय युनियन स्थापन
कामगारांसाठी काम करणार्‍या या संस्थेमध्ये कामगार युनियनची ही लवकरच स्थापना होणार असल्याचे शिखर एनजीओचे अध्यक्ष रफिक शेख यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी संजय पाटील, मुजाहिद तडवी, जाकिर खान, तनवीर अहमद, वासेफ पटेल, सय्यद मोहम्मद, तनवीर अहमद, साजीद कुरेशी, खलील मण्यार फुरकान आबिद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सोळाशे कुटुंबांनी केली नावनोंदणी
कामगार मेळाव्याच्या या कार्यक्रमांमध्ये आयुष्यमान भारत, पीएम विश्वकर्मा योजना, बांधकाम कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 1600 कुटुंबाची नाव नोंदणी सुद्धा करण्यात आली. गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस, खेळाविषयी मार्गदर्शन यासह अन्य विषयावर सुद्धा नजीकच्या काळात मार्गदर्शन करणार असल्याचे रफीक शेख म्हणाले.


कॉपी करू नका.