112 क्रमांकावर प्रतिसाद न देणारे चार पोलीस अधिकारी कंट्रोल अ‍ॅटॅच : धुळे पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने खळबळ

तिघा कर्मचार्‍यांवर निलंबनाची कुर्‍हाड : पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने खळबळ


Four police officers who did not respond to 112 number, control attache: Dhule Police Superintendent’s action caused excitement धुळे : धुळे जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक श्रीकांत धीवरे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र शिस्त मोडणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर ते कारवाई करण्यास कदापि मागे पुढे हटत नाही याचा परीचय धुळे जिल्हावासीयांना पुन्हा आला आहे. 112 क्रमांकावर प्रतिसाद न देणार्‍या चार अधिकार्‍यांना तडकाफडकी त्यांनी कंट्रोल अ‍ॅटॅच करण्यात आले असून तिघा कर्मचार्‍यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केल्याने धुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. यापूर्वी महामार्गावर वाहनधारकांकडून अवैधरीत्या वसुली करणार्‍यांवरही कारवाई झाल्याचे उदाहरण ताजे असताना आता पुन्हा अधिकार्‍यांवरच कारवाई झाल्याने अन्य अधिकार्‍यांनी या कारवाईचा धसका घेतला आहे.

यांच्यावर झाली कारवाई
धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे आणि निजामपूर पोलीसस ठाण्याचे एच. एल.गायकवाड यांना नियंत्रण कक्षात अ‍ॅटॅच करण्यात आले आहे.

तीन कर्मचार्‍यांवरही निलंबनाची कारवाई
धुळे शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हिमांशू ठाकूर, निजामपूरचे कृष्णा भील व सुनील अहिरे यांना थेट निलंबित करण्यात आले आहे.

112 क्रमांकावर प्रतिसाद न दिल्याने कारवाई
नागरीकांच्या सेवेसाठी 112 क्रमांक सुरू करण्यात आला असलातरी त्याला प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गत आठवड्यात कर्मचार्‍यांना समज दिली होती मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्याने थेट कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांनी नागरी हिताला प्राधान्य देवून सेवा पुरवणे गरजेचे आहे मात्र समज देवूनही सुधारणा न झाल्याने कारवाई करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले. यापुढेही सातत्याने कारवाई सुरूच असेल, असे त्यांनी सांगितले.


कॉपी करू नका.