नवापूर तालुक्यातील सरपंचासह कृषी विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

साडेसहा हजारांची लाच भोवली ; लाचखोरांच्या गोटात खळबळ


Agricultural Extension Officer along with Sarpanch of Nawapur taluka in ACB net नंदुरबार : विहिर दुरुस्तीचे काम बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत करू देण्यासाठी तडजोडीअंती साडेसहा हजारांची लाच स्वीकारताना देवलीपाडा, ता.नवापूर येथील सरपंच प्रदीप गावी व नवापूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे यांना नंदुरबार एसीबीने रंगेहाथ अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
देवळीपाडा येथील 23 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावावर देवळीपाडा शिवारात शेतजमीन असून या शेतात असलेली विहिर दुरुस्तीचे काम बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत करण्याकरीता बोरसे यांनी बुधवारी सात हजारांची लाच मागितली व त्यानंतर एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. नवापूर येथील हॉटेल शिवम येथे पंचांसमक्ष सरपंचांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व नंतर कृषी विस्तार अधिकारी बोरसे यांनाही अटक करण्यात आली. हा सापळा बुधवार, 28 रोजी यशस्वी करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, विजय ठाकरे, देवराम गावीत, सुभाष पावरा, हवालदार विलास पाटील, नरेंद्र पाटील, संदीप नावडेकर, चालक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.