शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : मद्याची चोरटी वाहतूक ; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त


Big operation of Shirpur taluka police : Liquor smuggling; Assets worth five and a half lakhs seized
शिरपूर :
शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे परवान्याविना मद्याची होणारी चोरटी वाहतूक रोखत एक लाख 83 हजार 120 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवार, 29 रोजी सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास करण्यात आली. मद्यसाठ्याची वाहतूक करणारा चालक राम बाबू भील (55, रा.पळासनेर, ता.शिरपूर) यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका निरीक्षक श्रीराम पवार यांना अवैधरीत्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. मध्यप्रदेशातील आंबा ते खंबाळे गावादरम्यान गुरुवारी सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास महिंद्रा मॅक्स वाहन (एम.एच. 29 जे 0261) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात बियरची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे स्पष्ट होताच वाहनासह चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनातून बियरच्या टीनचे 70 बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत एक लाख 83 हजार 120 रुपये आहे. साडेतीन लाखांचे वाहन मिळून पाच लाख 33 हजार 120 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव, चालक हेड कॉन्स्टेबल येवलेकर, पोलीस कॉन्स्टेबल नेरकर, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.