धुळ्यातील शुभम साळुंखे खून प्रकरण : वॉण्टेड आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


धुळे : धुळे शहरातील गोल चौकी परिसरात शुभम साळुंखे या युवकाचा पूर्व वैमनस्यातून 8 ऑक्टोबर 2023 रोजी खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयितांविरोधात खुनासह आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय या खटल्यातील संशयितांविरोधात नंतर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यान्वये (मोक्का) लावण्यात आला होता. या गुन्ह्यात सात आरोपींना अटक झाली असलीतरी अन्य संशयित ओळख लपवून फिरत होते मात्र धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून संशयित हर्षल रघुनाथ चौधरी (28, रा.हमाल मापाडी प्लॉट, कृष्णावाडी, धुळे) यास बेलापूर, नवी मुंबई येथून अटक केली आहे.

वॉण्टेड आरोपीला छुपी मदत : आरोपी मुलाला बेड्या
खून प्रकरणातील संशयित आरोपी विनोद रमेश थोरात याचा शोध सुरू असताना त्यास मुलगा परेश विनोद थोरात (22, रा. मनमाड जीन, पाण्याची टाकीजवळ, धुळे) हा मदत करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्यास रविवार, 3 मार्च रोजी अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे, श्री. किशोर काळे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, योगेश राऊत संजय पाटील, हेमंत बोरसे, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.