धुळ्यात जुन्या वादातून 25 वर्षीय युवकाचा खून : तीन आरोपींना अटक


Murder of 25-year-old youth due to old dispute in Dhule : Three accused arrested धुळे : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून धुळ्यातील 25 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना धुळ्यातील सहजीवन नगरातील नवनाथ मंदिराजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर 12.20 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अमोल गुलदगडे (25, सहजीवन नगर, महादेव मंदिराजवळ, धुळे) या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पाच संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. खून प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली.

धारदार शस्त्राने गळा चिरत रूमालाने आवळला गळा
संशयित हर्षल मेढे यास एका गुन्ह्याच्या कारणावरून 2018 मध्ये अमोल गुलदगडे याने मारहाण केली होती व सुमारे पाच वर्षांपासून हा राग संशयिताच्या डोक्यात होता. मारहाणीच्या रागातून सोमवारी रात्री 12.20 वाजेच्या सुमारास हर्षल मेंढे याने त्याच्या अन्य चार साथीदारांना घेवून अमोलला शिविगाळ करीत बेदम मारहाण केली तसेच एका संशयिताने धारदार हत्याराने अमोलच्या गळ्यावर वार केला तर अन्य एकाने अमोलच्या छातीवर बसून रुमालाने गळा आवळला.

तीन आरोपींना अटक
खून प्रकरणी सुरूवातीला हर्षल मेढझे यास अटक करण्यात आली तर दोन संशयित कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने राजेंद्र तुकाराम मेढे (53) व आदित्य राजाराम मेढे (19, लक्ष्मीवाडी, दसेरा मैदान, धुळे) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, संजय पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदीप सरग, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.