नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी पुन्हा डॉ.बी.जी.शेखर पाटील : कॅटमध्ये दिलासा


Dr. B. G. Shekhar Patil again as Special Inspector General of Nashik Examination : Relief in CAT नाशिक : सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने नाशिक परीक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर-पाटील यांची बदली केली होती या बदलीविरोधात डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली होती.

दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तसेच मे अखेरीस सेवानिवृत्ती असतानादेखील बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा डॉ.पाटील यांनी याचिकेत केल्यानंतर हा दावा ग्राह्य धरीत डॉ.पाटील यांची झालेली बदली रद्द करण्यात आली असून लवकरच डॉ.बी.जी.शेखर पुन्हा आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्याची दाट शक्यता आहे.

कॅटमध्ये मिळाला दिलासा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या अलीकडेच बदल्या केल्या होत्या. त्यानुसार डॉ.शेखर पाटील यांची बदली करीत त्यांच्या जागी ठाणे शहराचे तत्कालीन सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली तर डॉ.पाटील यांची पुणे मोटार परिवहन विभागात नियुक्ती करण्यात आली. परंतु या बदलीविरोधात डॉ. पाटील यांनी ‘कॅट’मध्ये याचिका दाखल केली व त्यांना दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, डॉ.बी.जी.शेखर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅटमध्ये दिलासा मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.


कॉपी करू नका.