चारचाकी-रीक्षात अपघात : टाकळीतील तरुणाचा मृत्यू ;सहा प्रवासी जखमी
Four-wheeler-rickshaw accident : Youth from Takli dies; Six passengers injured जामनेर : भरधाव चारचाकी व रीक्षात झालेल्या अपघाता रिक्षातील रवींद्र आनंदा बावस्कर (30, रा.टाकळी, ता.जामनेर) या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात रिक्षासह कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात टाकळी रोडवरील हॉटेल आर्यन गार्डनसमोर रात्रीच्या सुमारास घडला.
प्रवासी रीक्षा व कारमध्ये अपघात
जामनेर तालुक्यातील टाकळी येथे रवींद्र बावस्कर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीत नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. दि.18 रोजी रात्रीची ड्युटी करून तो सहकार्यांसोबत तिन चाकी प्रवासी वाहतूक करणार्या (एम.एच.19 बी.जे. 1694) क्रमांकाच्या रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी पहूर कडून जामनेरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या (एम.एच. 19 सीयु 0037) क्रमांकाच्या कारची आणि रिक्षाची जामनेर ते टाकळी दरम्यानच्या हॉटेल आर्यनगार्डनजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले तर रवींद्र बावस्कर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघातात कारसह रिक्षातील सहा गंभीर जखमी !
या अपघातात कार चालक सुमित नारायण पाटील (34, रा.आमखेडा) तर रिक्षातील प्रवासी अनिल मुरलीधर सातव (23), जीवन विकास अहिरे (21), अजय किरण चवरे (20), सुनील मुरलीधर जाधव (30), रामेश्वर बाजीराव मोरे (24, सर्व रा.टाकळी, ता.जामनेर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !
अपघातात मयत झालेल्या रवींद्र बावस्कर यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राजू देवचंद बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चालक सुमित पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.