मुख्यमंत्री शिंदे गटाच्या यादीत सात विद्यमान खासदारांना संधी : श्रीकांत शिंदेंना पहिल्या यादीत संधी नाही


Chances for seven sitting MPs in Chief Minister Shinde group’s list: Srikant Shinde has no chance in the first list मुंबई : लोकसभा निवडणुकीचा एकीकडे आखाडा तापत असताना दुसरीकडे अनेक पक्षांकडून अद्यापही उमेदवारीबाबत सस्पेन्स आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली मात्र त्यात पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत मात्र पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही.

सात उमेदवारांना पुन्हा संधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये आठ पैकी सात विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिवराव लोखंडे यांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स कायम
नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांना श्रीकांत शिंदे यांनी आधीच उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर हेमंत गोडसे यांच्या नावाला भाजपमधून जोरदार विरोध झाला होता. हेमंत गोडसे यांनी देखील विरोधानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र, तरी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीत आल्यास मनसेला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा देखील शिंदे यांच्या पहिल्या यादीत करण्यात आलेली नाही.

असे आहेत शिंदे सेनेचे उमेदवार
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर- संजय मंडलिक
शिर्डी- सदाशीव लोखंडे
बुलढाणा- प्रतापराव जाधव
हिंगोली- हेमंत पाटील
मावळ- श्रीरंग बारणे
रामटेक- राजू पारवे
हातकणंगले- धैर्यशील माने


कॉपी करू नका.