संगणकाद्वारे बनवले बनावट मतदान कार्ड : आरोपीला धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक


Computer generated fake voter card : Accused arrested by Dhule Local Crime Branch धुळे : धुळे गुन्हे शाखेने बनावट आधार कार्ड तयार करणार्‍या दोघांना अटक केली आहे. शहरातील भटाई माता रिक्षा स्टॉप जवळील सूर्यादय फोटो स्टुडीओ येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी 14 लोकांचे बनावट मतदान कार्ड तसेच मतदान कार्ड तयार करण्यासाठी लागणारा फोटो पेपर, संगणक व प्रिंटर तसेच या कामासाठी वापरण्यात येणारा मोबाईल मिळून 35 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. सूर्यकांत दत्तात्रय कोकणे (पाण्याच्या टाकी जवळ, मोहाडी उपनगर धुळे) व विनोद नामदेव गरुड (गायकवाड चौक, धुळे) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश पाटील, संदीप पाटील, सुरेश भालेराव, रवींद्र माळी, रवीकिरण राठोड, निलेश पोतदार, सुशील शिंदे, गुणवंत पाटील आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.