अट्टल मोबाईल चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

चोरीचे आठ मोबाईल जप्त : अनेक गुन्हे उघडकीस येणार


Attal mobile thief in Bhusawal Lohmarg police net भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी अट्टल मोबाईल चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाईल जप्त केले आहे. गजानन वसंता सुशीर (30, धरणगाव, ता.मलकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चोरी प्रकरणी आरोपी जाळ्यात
अश्विनी प्रदीप बनसोडे (भांडूप पूर्व मुंबई) या 8 फेब्रुवारी 2024 रोजी डाऊन शालिमार 018029 ने ठाणे ते अकोला असा प्रवास कोच एच- 5 (बर्थ 17-18) मधून करीत असताना भुसावळ सुटल्यानंतर त्यांची झोपेचा फायदा घेत पर्स चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली. पर्समध्ये 35 हजारांचा मोबाईल व रोख रक्कम, कागदपत्रे मिळून 38 हजार 800 रुपयांचा ऐवज होता. तांत्रिक विश्लेषणानंतर नरेश बगाडे यास चोरीच्या मोबाईलसह ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आरोपी गजानन सुशीर याच्याकडून चार हजारात मोबाईल विकत घेतल्याची कबुली दिल्यानंतर सुशीर यास अटक करण्यात आली तसेच एकूण एक लाख 38 हजारांचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले.



यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई भुसावळचे सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिवाणसिंग राजपूत, धनराज लुले, विशाल चौधरी, बाबू मिर्झा, राजेंद्र गवई तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक महेंद्र कुशवाह इमरान खान आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार राजेंद्र गवई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !