नंदुरबार शहरातील मुदत संपलेल्या परवान्याव्दारे वाळू वाहतूक : अवजड ट्रॉला किनगावजवळ जप्त


Transport of sand under expired license in Nandurbar town : Heavy trawler seized near Kingaon
यावल :
यावल तालुक्यातील किनगावजवळ मुदत संपलेल्या परवान्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॉला महसूलच्या गस्ती पथकाने पकडला. हा ट्रॉला नंदुरबार येथून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावरून यावलमार्गे भुसावळ शहरात अवैध वाळू वाहतूक होता. सदरील टॉला गुरूवारी पहाटे पकडून घटनास्थळाचा पंचनामा करीत यावल तहसीलमध्ये जमा करण्यात आला. या कारवाईमुळे अवैद्य वाळू वाहतूक करणार्‍यामध्ये खळबळ उडाली.

कारवाईने वाहतूकदारांमध्ये खळबळ
किनगाव, ता.यावल येथे महसुलचे गस्ती पथक गस्त घालत असताना गुरूवारी पहाटे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉला (क्रमांक एम.एच.15 एम.एम.6060) हा भरधाव वेगाने यावलच्या दिशेने जातांना दिसला. महसुलच्या गस्ती पथकाने सदर ट्रॉला पाठलाग करून थांबवला असता चालक धनराज भाईदास सोेनवणेे (निजामपूर, ता.साक्री) याने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील मुदत संपलेली गौन खनिज वाहतुकीचा परवाना दाखवला मात्र तो मुदत संपलेला होता.



घटनास्थळी या वाहनाचा पंचनामा करीता आला असता वाहनात सुमारे साडे सहा ब्रास वाळू होती. पंचनामा करीत वाहन यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी सचिन जगताप, तलाठी मिलिंद कुरकूरे, कोतवाल समीर तडवी, कोतवाल गणेश माळी, विजय भालेराव यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यामध्ये खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !