भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफ निरीक्षकांवर हल्ला : दहा संशयीत कोठडीत
Attack on RPF inspectors at Bhusawal railway station: 10 suspects in custody भुसावळ : भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व कर्मचार्यावर विक्रेत्यांनी हल्ला केल्याची घटना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरील मद्रास बेकरीवर घडली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दहा आरोपींनी अटक केली होती. संशयीतांची कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
14 संशयीतांविरोधात गुन्हा
जंक्शनवरील प्लॅटफार्म 5 वर दोन गटातील विक्रेत्यांचा वाद झाल्यानंतर मोठी गर्दी जमली. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.मीना व सहकारी महेंद्र कुशवाह हे वाद मिटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर विक्रेत्यांनी हल्ला केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात 14 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दहा आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर ही मुदत संपल्यानंतर संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. लोहमार्ग पोलिसांतर्फे सरकारी वकील अॅड.नितीन खरे यांनी बाजू मांडली.


यांना मिळाली कोठडी
संशयीत शेख सद्दाम शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, आझाद शेख बशीर, शेख समीर शेख हमीद, कासिम हमीद सय्यद, शेख इरफान शेख चाँद, शेख सलमान शेख बशीर, रियाज मोहंम्मद अब्दुल रहेमान, अफसर रफिक मेमन उर्फ गुड्डू, वसीम खान बिस्मिल्ला खान यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सय्यद हमीद सय्यद कासीम व रईस सरदार बागवान उर्फ रईस पहेलवान यांना 10 एप्रिलपर्यत अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे करीत आहेत.