शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने जळगावातील नोकरदाराला 32 लाखांचा गंडा

0

32 lakhs to an employee in Jalgaon due to the lure of profit in share trading जळगाव : सोशल मिडीयातील विविध प्लॅटफार्मवरून नागरिकांना लिंक पाठवत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गंडवले जात आहेत. जळगावातून देखील असाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. विविध कंपनीचे शेअर खरेदी करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत कांचन नगरातील नोकरदाराला 32 लाख नऊ हजार 999 रुपयात गंडवण्यात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नफ्याचे आमिषाला तक्रारदार पडले बळी
जळगाव शहरातील कांचन नगरात मोहन रघुनाथ सपकाळे (42) हे वास्तव्याला आहे. 27 फेब्रुवारी ते 11 एप्रिल दरम्यान एका व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले असे नाव सांगणार्‍या दोघांनी सपकाळे यांच्याशी संपर्क साधला. महिलेने मोहन सपकाळे यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कंपनीचे शेअर खेरदी करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी के.एस.मीन या नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्यानुसार सपकाळे यांनी अ‍ॅप डाऊनलोड केले. त्या अ‍ॅपवर अभासी नफा मिळाल्याचे सांगून 32 लाख 9 हजार 999 रुपये गुंतविले. दरम्यान त्यांना भरलेल्या रकमेचा कोणताही परतावा मिळाला नाही.

सायबर पोलिसात गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवार, 13 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यावरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले असे नाव सांगणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.


कॉपी करू नका.