रावेर बसस्थानकातून एक लाखांचा विमल गुटखा जप्त

0

रावेर : रावेर बसस्थानक परिसरातून सुमारे एक लाख रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल गुटखा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पारोळा येथील रमेश रूपचंद पाटील इसमास पोलिसात अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर बसस्थानकात रावेर पोलीस गस्त घालत असताना मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बसस्थानकातील झाडाखाली एक इसम बसलेला आढळला व त्याच्याजवळ पांढर्‍या रेग्झीनमध्ये तीन गठ्ठे आढळले व पोलिसांना
पाहताच त्याने गठ्ठे उचलण्याची तयारी केली. संशयीताच्या हालचाली पाहून पोलिसांनी त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व गठ्ठ्यांची तपासणी केल्यानंतर त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल गुटखा आढळला. संशयीत रमेश रूपचंद पाटील (74, रा.शनिमंदिरा जवळ, पारोळा) या संशयीताला अटक करण्यात आली तर जप्त गुटखा हा बर्‍हाणपूर येथील आशिष एंटरप्राईजेजचे मालक प्रितेश सेठ यांच्याकडून विकत घेत बसने पारोळा येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडील एक लाख तीन हजार पाचशे रुपये किंमतीचा विमल गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला. याबाबत कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ करीत आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलीस अंमलदार ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 


कॉपी करू नका.