जळगावात केमिकल फॅक्टरी स्फोट : दोघे कामगार ठार : कंपनी मालकासह तिघांविरोधात गुन्हा

0

Chemical factory blast in Jalgaon: Two workers killed : Case against three including company owner जळगाव : जळगावच्या एमआयडीसी झालेल्या स्फोट प्रकरणी कंपनी मालकासह तिघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. दरम्यान, स्फोटात कंपनीतील 22 कामगार जखमी झाले आहेत. जळगावाील डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत बुधवारी सकाळी 9.10 वाजेच्या सुमारास डब्ल्यू सेक्टरमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू ओढवला आहे. आगीत दोन मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

स्फोटात दोन कामगार ठार
जळगावाील डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत बुधवारी सकाळी 9.10 वाजेच्या सुमारास स्फोट झाला. यावेळी 26 कामगार कार्यरत होते तर त्यातील दोघांचा मृत्यू ओढवला तर 22 जखमी झाले. या दुर्घटनेतून अनिता गायकवाड या महिलेसह कपिल बाविस्कर हे बचावले आहेत. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामचंद्र बोरसे व अन्य सहकारी घटनास्थळी पोहचले. तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.

कंपनी मालकासह तिघांविरोधात गुन्हा
कंपनीतील स्फोटप्रकरणी कपिल राजेंद्र पाटील (24, रा.आव्हाने, ता. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक लोमेश सुकलाल रायगडे, प्रशासकीय अधिकारी अनिल गुलाब पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधासह कलम 225, 283, 285, 337, 338 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत करीत आहेत.


कॉपी करू नका.