यावल, जामनेरसह चोपड्यात श्रीराम पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत

0

Spontaneous reception of Shriram Patil in Yaval, Jamner and Chopda रावेर : रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जामनेरसह चोपडा व यावल भागात भेटी देत श्रीरामनवमीचे औचित्य साधून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी ठिकठिकाणी त्यांनी मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्यानंतर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

चोपड्यातील तरुणाईकडून उत्सफूर्त प्रतिसाद
चोपडा येथील पाटील गढीतील पुरातन श्रीराम मंदिरात उमेदवार श्रीराम पाटील यांनी जावून दर्शन घेतले. यावेळीही राणू देशमुख, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, तात्यासाहेब मधुकर गुरुजी यांच्यासह पाटील गढी मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. श्रीराम नवमीनिमित्त दरवर्षी सप्तशृंगी (वणी )गडावर जाणार्‍या पाटील गढी मित्र मंडळातील पदयात्रेतील युवकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावल तालुक्यात मतदारांकडून स्वागत
यावल तालुक्यातील शिरसाड येथील श्रीराम मंदिरात रामलल्लांचे दर्शन श्रीराम पाटील यांनी घेतले. यावेळी निर्मल पाटील, अनिल पाटील, भैय्या पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद ढाके, निलेश पाटील, पप्पू तळले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावल तालुक्यातील साकळी येथे ग्रामपंचायतीला भेट देऊन पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, उपसरपंच फकरुद्दीनखान शौकतखान कुरेशी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांनी दिले. यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांच्या कार्यालयाला महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी भेट दिली. यावल तालुका महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या नियोजनाबाबत म्हणविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी मुकेश येवले, रवींद्र सोनवणे, शेखर पाटील, संदीप सोनवणे, जलील पटेल, कदीर खान, प्रशांत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. तसेच यावल येथील प्रसिद्ध व्यापारी भगतसिंग देवनाथ पाटील यांचीही श्रीराम पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावल तालुक्यातील दहिगाव येथील मारुती व महादेव मंदिरात दर्शन घेत ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी वि.का.सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण पाटील, मिलिंद नेहते, संतोष पाटील, दिलीप चौधरी, दिनकर फेगडे, अनिल बढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

जामनेरला प्रचंड उत्साह
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जामनेर येथे भेट दिल्यानंतर नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील पदाधिकार्‍यांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा निरीक्षक प्रसन्नजीत पाटील, डी.के.पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, व्ही.पी.पाटील, उत्तम पाटील, अशोक चौधरी, गौरव काळे, किशोर खोडपे, प्राल्हाद बोरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.