नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे नाशिक एसीबीच्या जाळ्यात

गुजरातच्या गुन्ह्यात मध्यस्थी भोवली 50 हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

0

Nawapur Inspector Dnyaneshwar Vare नवापूर : गुजरातच्या सोनगड पोलीस ठाण्यात प्रोव्हीबिशनच्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी आलेल्या पथकासोबत मध्यस्थी करून अटक टाळण्यासाठी नवापूरातील तक्रारदाराकडे सुरूवातीला अडीच लाख रुपये मागून त्यातील एक लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा 50 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नवापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे (49, फ्लॅट नंबर 6, बी विंग, आशर इस्टेट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक) (Nawapur Inspector Dnyaneshwar Vare) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी अटक केली.. दरम्यान, वारे यांच्यावर एसीबीचा टॅ्रप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूरातील त्रस्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर येत रोष व्यक्त केला. शहरातील तणावाची परिस्थिती पाहता नंदुरबार येथून तातडीने रात्रीच मोठी कुमक मागवण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
नवापूरातील 35 वर्षीय तक्रारदार यांच्याविरोधात सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी, राज्य गुजरात येथे गुन्हा रजिस्टर नंबर 583/2023 प्रमाणे प्रोव्हीबिशनचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तापी एलसीबीचे पथक अलीकडे नवापूरात आल्यानंतर त्यांनी नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे (Nawapur Inspector Dnyaneshwar Vare) यांची भेट घेतली. या गुन्ह्यात आरोपीला अटक न होवू देण्यासाठी वारे यांनी अडीच लाखांची लाच मागितली व त्यावेळी 5 मार्च 2024 रोजी वारे यांनी एक लाख रुपये घेतले व त्यानंतर पुन्हा दिड लाखांची मागणी वारे यांनी केली. यावेळी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर वारे यांनी 50 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. निरीक्षक वारे यांनी राहत्या घरातच 50 हजारांची लाच स्वीकारताच त्यांना एसीबीने अटक केली

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक (रीडर) नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

नवापूराकर संतप्त : निरीक्षकांविरोधात जोरदार घोषणाबाजी
निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या विरोधात संतप्त नवापूरातील काही नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली.


कॉपी करू नका.