दहावी परीक्षेचा उद्या निकाल : या संकेत स्थळावर उपलब्ध होणार निकाल
नाशिक : दहावी परीक्षेचा निकाल उद्या सोमवार, 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होत आहे. गेल्या आठवड्यातच बोर्डाच्या वतीने बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला व विद्यार्थ्यांना दहावी निकालाच्या तारखेची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल उद्या सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
या संकेत स्थळावर उपलब्ध होणार निकाल


https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sseresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेशाला सुरूवात
दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीने करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.