दहावी परीक्षेतही सावित्रीच्या लेकीच टॉपर : राज्याचा निकाल 95.81 टक्के
Savitri’s daughter also topper in 10th exam: State result 95.81 percent मुंबई : बारावी प्रमाणेच दहावी परीक्षेतही सावित्रीच्या लेकीच राज्यात टॉपर ठरल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 95.81 टक्के लागला. यंदा 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही कोकण विभाग आघाडीवर आहे. गतवर्षी हा निकाल 93.83 टक्के होता तर त्यात 1.78 टक्के वाढ झाली.
विभागनिहाय निकाल असा-
पुणे- 96.44 %
नागपूर- 94.73 %
छत्रपती संभाजीनगर- 95.19 %
मुंबई- 95.83 %
कोल्हापूर- 97.45 %
अमरावती- 95.58 %
नाशिक- 95.28 %
लातूर- 95.27 %
कोकण- 99.01%


नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल
यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21 टक्के तर 94.56 टक्के ही मुलांची उत्तीर्ण टक्केवारी आहे.
187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
राज्यातील नऊ विभागांमधून तब्बल 187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यापैकी सर्वाधिक 100 टक्के प्राप्त केलेले विद्यार्थी लातूरमधील आहेत. लातूर विभागात तब्बल 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के प्राप्त झाले तर दहावीच्या निकालात एक लाख 84 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण मिळवले.