रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : मुंबईत ब्लॉक : 18 रेल्वेगाड्या रद्द ; सेवाग्राम नाशिकपर्यंत धावणार


Attention Railway Passengers : Block in Mumbai : 18 Trains Cancelled ; Sevagram will run till Nashik भुसावळ : मुंबई रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी रेल्वेतर्फे ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस 18 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 19 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. यात सेवाग्राम एक्स्प्रेस ही 31 मे व 1 जून असे दोन दिवस नाशिकला तर विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा दादरला याच दोन दिवशी टर्मिनेट करण्यात येणार आहे.

18 रेल्वेगाड्या रद्द
मुंबईच्या ब्लॉकमुळे शुक्रवार, 31 मे रोजी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, हावडा- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या तर 1 जूनला अप मार्गावरील भुसावळ विभागातील पंचवटी एक्स्प्रेस, धुळे-मुंबई एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी मुंबई व जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. डाऊन मार्गावर 1 जूनला मुंबई-साईनगर वंदेभारत एक्स्प्रेस, मुंबई-धुळे एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. 2 जूनला अप मार्गावरील मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, धुळे-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली तर 2 जूनला डाऊन मार्गावरील मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-धुळे एक्स्प्रेस, मुंबई-जबलपूर गरीब रथ, मुंबई-हावडा एक्स्प्रेस, या गाड्या रद्द करण्यात आल्या.



दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट
30 व 31 मे रोजी अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस व हावडा मुंबई मेल, 31 मे व 1 जूनला विदर्भ एक्स्प्रेस, पंजाब मेल 30 व 31 मे रोजी, 1 जून रोजी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, 30 मे रोजी हावडा-मुंबई मेल, 31 मे रोजी हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, 30 मे रोजी हावडा-मुंबई मेल, 31 मे रोजी पुष्पक एक्स्प्रेस व हावडा मुंबई एक्स्प्रेस या गाड्या शार्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !