भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्यांकडे ससुनच्या ‘त्या’ डॉक्टरांची चौकशी


Investigation of Sassoon’s ‘those’ doctors with serious allegations of corruption पुणे : बिल्डरच्या दिवट्या पूत्राने केलेल्या अपघाताचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच ससूनमधील डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती बनविण्यात आली असून या समितीतील डॉक्टरांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यामुळे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी या समितीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उंदराला मांज साक्षीचा प्रकार
एका डॉक्टरच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यांनाच नेमल्याने झगडे यांनी ‘उंदराला मांजर साक्ष’ अशी या समितीला उपमा देत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेसबुकवर पोस्ट करत झगडे यांनी त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, असा टोलाही सरकार व प्रशासनाला लगावला आहे.

झगडेंकडून प्रशासन धारेवर
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सुधीर चौधरी ही समिती नेमण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी सापळेंवर गंभीर आरोप केले होते. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजेमधील भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप आहेत. यावरून झगडेंनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !