दिलासादायक बातमी : उद्या केरळात धडकणार मान्सून !
Comforting news : Monsoon will hit Kerala tomorrow! नवी दिल्ली : उकाड्याने बेजार झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. मान्सुन अवघ्या 24 तासात केरळात दाखल होत असून 10 जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही तासात मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो. पुढील 24 तासांत मान्सून केरळात दाखल होणार आहे.
वेळेआधीच दाखल होणार मान्सून
राज्यात मान्सून सर्वसाधारण 1 जूनपर्यंत दाखल होतो मात्र यंदा केरळात यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे. हवामान खात्यानुसार, 30 मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होईल. त्यानंतर राज्यात जोरदार पाऊस पडेल. केरळात आधीच मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र दिसत आहे. केरळात प्री मान्सून लवकरच मान्सून पावसात बदलेल, आयएमडीने म्हटले आहे.


कोणत्या राज्यात कधी पाऊस येणार?
अंदमान निकोबार- 22 मे
बंगालची खाडी- 26 मे
केरळ, तामिळनाडू- 30 मे, 1 जून
कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम- 5 जून
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या वरच्या बाजूस, पश्चिम बंगाल- 10 जून
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहार- 15 जून
गुजरात, मध्य प्रदेशातील काही भागात, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात- 20 जून
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर- 25 जून
राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब- 30 जून
राजस्थान- 5 जुलै