कुविख्यात गुन्हेगार सम्राट सावळे स्थानबद्ध


Notorious criminal Samrat Sawale stationed अकोला : अकोटफैलस्थित भीम चौकातील रहिवासी व कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे (30) यास स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सम्राट सावळे विरोधात अनेक गंभीर गुन्हे
अकोटफैलस्थित भीम चौकातील रहिवासी व कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे याच्याविरोधात घातक हत्यारांनी हल्ला करुन दुखापत करणे, गृहअतिक्रमण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन परिसरात दहशत निर्माण करणे, अश्लील कृती करणे, बेकायदेशीर जमावाला चिथावणी देऊन दंगा करणे, बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी संशयीताला स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला अजित कुंभार यांनी मंजुरी देताच पोलिसांनी 1 जून रोजी कुख्यात सम्राट सावळेला अटक करुन त्याची एक वर्षांच्या कालावधीसाठी कारागृहात रवानगी केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, फौजदार आशिष शिंदे, उदय शुक्ला आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !