पुण्यातील र्पोशे अपघात : अल्पवयीन आरोपीची दारू पिल्याची कबुली


पुणे : राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने चौकशीत मद्य प्राशन केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी 1 जून रोजी बालगृहात आरोपीची आईच्या उपस्थितीत चौकशी केली होती. जुवेनाईल बोर्डाने 31 मे रोजी पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात आली नाही किंवा त्याचे कोणतेही बयाण नोंदवले गेले नाही.

दोघाांचा जागीच मृत्यू
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 18-19 मे च्या रात्री धनिक बाळाने दोनशे किलोमीटर वेगाने कार चालवून धडक दिल्याने अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. तो ताशी 200 किलोमीटर वेगाने कार चालवत होता.

आई-वडील पोलीस कोठडीत
दरम्यान, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने रविवार, 2 जून रोजी अल्पवयीनाचे वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल यांना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांवर रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे.

आरोपीच्या आईला 1 जूनच्या रात्री अटक
आरोपी अल्पवयीन मुलीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी 1 जूनच्या रात्री अटक केली होती. शिवानी अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून घेण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना दिल्याचा आणि डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

घटनेच्या वेळी तो मद्यप्राशन केलेला नव्हता हे दाखवण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना एका महिलेच्या नमुन्याने बदलण्यात आला होता, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. ही महिला दुसरी कोणी नसून आरोपीची आई होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !