ईडीचा धाक दाखवत भुसावळातील अभियंत्याला 15 लाखांचा गंडा


जळगाव : टिळकनगर पोलीस ठाण्यातून सब इन्सपेक्टर विनायक बाबर बोलतोय, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. तुमच्याविरुध्द ईडी कार्यालयात तक्रार नोंद असून तुमचे पकड वारंट निघाले आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी तत्काळ रक्कम भरणा करा, असा दम भरत सायबर ठगांनी भुसावळातील एका अभियंत्याला खात्यात 15 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. भुसावळ येथे हा खळबळजनक प्रकार घडला असून या प्रकरणी गुरुवार, 27 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
बुधवार, 26 रोजी तक्रारदार यांना सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासांनी बंद करण्यात येईल, असा सायबर ठगाने दम भरला. तक्रारदाराने कारण विचारताच संशयित म्हणाला, तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात तुमच्याबद्दल ईलीगल अ‍ॅडव्हरटायझींग गेम्बलिंग, मुंबई येथे तक्रार दाखल आहे. त्यानंतर तुमचा कॉल पोलीस स्टेशनला ट्रॉन्सपर करतो. तुमचा अजुन कोणता मोबाईल क्रमांक असेल तर सांगा, अशी विचारणा केली. त्यानुसार तक्रारदाराने त्यांचा दुसरा क्रमांक सांगितला. त्यानंतर संशयिताने कॉल बंद केला.

आधारकार्ड दुरुपयोग केल्याचा दिला दम
काही अवधीत तक्रारदार यांना व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर सकाळी 9.52 वाजता कॉल आला. विनायका बाबर सब पोलीस इन्स्पेक्टर, टिळकनगर पोलीस ठाणे येथून बोलत आहे, अशी ओळख देत संशयीत सुरुवातीला हिंदीत बोलला. त्यानंतर तो म्हणाला, तुम्ही मराठी व्यक्ती आहे, म्हणून मी मराठी भाषेत बोलतो. तुमच्याविषयी टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार दाखल आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड आम्हाला व्हॉटसअ‍ॅपवर पाठवा. पोलीस अधिकार्‍याचा फोन असल्याचे समजून तक्रारदाराने विश्वास ठेवत त्यांचे आधार कार्ड व्हॉटसअ‍ॅपने पाठविले. त्यानंतर हा तोतया अधिकारी म्हणाला, तुमच्या कार्डाचा गैरवापर झालेला आहे. त्याव्दारे तुमच्या नावाने कॅनरा बॅक अंधेरी येथे अकाउंट ओपन करून अकाउंटचा गैरप्रकारे आर्थिक व्यवहार केला आहे. त्यानंतर या तोतया पोलीस अधिकार्‍याने तक्रारदाराच्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावरुन क्राईम ब्रँच, मुंबई यांचा एक रिपोर्ट बनावट पत्र पाठविले. आरबीआय बँकेच्या तक्रारदाराच्या नावाचे पत्रही पाठविले. पुढे हा तोतया अधिकारी म्हणाला, तुमचे आधार व्हेरिफिकेशनसाठी टाकावे लागेल, त्यासाठी कॉन्फ्ररन्समध्ये कोणाला तरी घेवून तक्रारदार यांना आधारकार्ड संदर्भात विचारणा केली. समोरीत व्यक्ती तक्रारदाराला म्हणाला, या आधार कार्डासंदर्भात तक्रार दाखल आहे.

विश्वास नागरे पाटील यांच्या कॉन्फरन्सची दाखविली भीती
त्यानंतर विनायक बाबर याने तक्रारदाराच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर ईडी कार्यालयाचे पत्र पाठविले. विनायक बाबर यांनी सांगितले, मी तुम्हाला माझे सुपेरिअर ऑफिसर विश्वास नागरे पाटील यांच्यासोबत कॉन्फरेन्समध्ये घेतो, अशी थाप दिली. नंतर या तोतया अधिकार्‍याने सांगितले, तुमच्या विरुध्द ईडीच्या ऑफिसला तक्रार नोंद झाली आहे. त्यावर तुमचे पकड वारंट त्यांच्याकडे आहे. हा प्रकार थांबवायचा असेल तर तुम्हाला काहीतरी सेटलमेंट करुन तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल. तसेच मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल. आपल्यात झालेली चर्चा नॅशनल सिक्युरिटी म्हणून कोणाला बोलू नका, असाही तक्रारदाराला दम भरला.

खात्यात पैसे भरल्याची पावती पाठविली ठगांना
तोतया पोलीस अधिकारी विनायक बाबर याने तक्रारदाराला त्यानंतर वैयक्तिक माहिती विचारण्यास सुरुवात केली. त्यात वय, व्यवसाय, मुले, संपत्ती, गुंतवणूक व बँक खात्याची माहितीची चौकशी केली. बोलणे झाल्यानंतर तुम्हाला अटक करण्यासाठी अटक वारंट वरिष्ठांकडून प्राप्त झाले आहे. ते वारंट मी फ्रिज करु शकतो. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये जमा करावे लागेल, असा दम भरला. तुम्ही फोन चालू ठेवा आणि तुमचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँक शाखेत जावुन आम्ही सांगू त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहे. त्यानंतर विनायक बाबर याने व्हाटसअ‍ॅप क्रमांकावरुन तक्रारदाराच्या नमूद मोबाईल क्रमांक यावर संबधित बँकेची माहिती पाठविली. त्यामध्ये बंधन बँक गोमतीनगर शाखेतील एका खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवरुन तक्रारदाराला कॉल केला. तुम्ही आताच्या आता बँकेत जावुन पैसे भरा नाहीतर तुम्हाला अटक होईल. या प्रकाराने तक्रारदार भयभीत झाले. ते कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँक, भुसावळ या खात्यातून विनायक बाबर यांनी दिलेल्या बंधन बॅक गोमती नगर शाखेच्या खात्यात 15 लाखांची रक्कम आरटीजीएसमार्फत भरली. त्यानंतर पैसे भरल्याच्या रक्कमेची स्लिप विनायक बाबर यांना व्हॉटसपवर पाठवली.

तक्रारदार यांनी हा प्रकार त्यांच्या परिवार व मित्रांना सांगिलते असता तुमची कोणीतरी फसवणूक केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !