भुशी धरणात वाहिलेल्या चौघांचे मृतदेह सापडले : चार वर्षीय बालकाचा शोध सुरू
Bodies of four bodies found in Bhushi Dam : Search for four-year-old boy underway लोणावळा ः भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटूंबातील पाच जण वाहून गेल्याने खळबळ उडाली. वाहिलेल्यांपैकी चौघांचा मृतदेह हाती आले असून एका चार वर्षीय बालकाचा शोध सुरू आहे. लोणावळा शहरा जवळीलभुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहातून पाच जण रविवारी दुपारी एक वाजता वाहून गेले होते.
चौघांचे मृतदेह सापडले
नूर शाहिस्ता अन्सारी (35), अमीना अदिल अन्सारी (13), मारिया अन्सारी (7) व हुमेदा अन्सारी (6) अशी मृतांची नावे असून अदनान अन्सारी (4) या बालकाचा शोध सुरू आहे. शिवदुर्ग रेसक्यु पथक, मावळ वन्यजीव रक्षक पथकाकडून बालकाचा सुरू आहे.

एकाच कुटुंबातील पाच जण वाहिले
लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेले पाच जण वाहून गेले होते. अन्सारी हे कुटुंब भुशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटर फॉल (बॅक वॉटर) येथे वर्षाविहाराचा आनंद घेत असताना वॉटर फॉलमधून भुशी धरणात पाचही वाहून गेले होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे पाच जण वाहून गेले होते.
