भुसावळ तालुक्यात अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती


In Bhusawal taluka, minor girl is pregnant due to torture भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावात 17 वर्षाच्या दिव्यांग तरुणीवर अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहहे. याप्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ तालुक्यातील एका गावाच्या शिवारात 17 वर्षीय दिव्यांग तरुणीवर आरोपी गोपाळ भीमसिंग बारेला याने अत्याचार केला. ही घटना 9 जून 2024 च्या दोन महिन्यांपूर्वी घडली. ही बाब कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाणे गाठले. पीडीतेच्या आईने भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ बारेलाविरूध्द पोस्कोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आाल. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !