भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचार्‍याचा हदयविकाराने मृत्यू


An employee of Bhusawal Ordnance Factory died of cardiac arrest भुसावळ : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत ठेकेदारी पध्दतीने कामास असलेला कर्मचारी तिलेश पाटील (26, रा.हनुमान नगर, भुसावळ) याचा शनिवारी कामावर असतांना हृदयविकाराने मृत्यू झाला. तरुणाच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला तात्काळ हॉस्पीटलमध्ये जाण्यास सांगितले मात्र पीओएचपर्यंत गेल्यावर त्यास हृदयविकाराचा झटका आला व तो खाली पडताच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घडली.

कामावर आला हृदयविकाराचा झटका
तिलेश हा तरुण ऑर्डनन्स फॅक्टरीतील जीएम कार्यालयात ठेकेदारी पद्धत्तीने ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. शनिवारी तो कामावर असतांना त्याला सकाळी 10 वाजता अचानक अस्वस्थ वाटू लागले व त्याच्या छातीत दुखू लागल्याने हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला त्याच्या मित्रांनी दिला मात्र मी घरी जाऊन आराम करतो, असे त्याने सांगत मोटर सायकलवर काढली मात्र पीओएच कारखान्याच्या गेटजवळ रस्त्यावर तो खाली कोसळला. यावेळी तेथे जमा झालेल्या लोकांनी आणि आयुध निर्माणीतील कर्मचार्‍यांनी त्यास आयुध निर्माणीच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याची तपासणी केली असता, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आयुध निर्माणीतील कर्मचार्‍यांनी यावेळी मृत तिलेश याला श्रध्दांजली अर्पण केली. एकूलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटूंबियांनी आक्रोश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !