नायगाव येथील खळ्यातून बैल चोरी
यावल : यावल तालुक्यातील नायगाव येथील चुंचाळे रोडवर असलेल्या खळ्यातून अज्ञात चोरट्याने 15 हजार रुपये किंमतीचा बैल चोरी केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नायगाव, ता.यावल या गावातील शेतकरी रामदास निंबा पाटील यांचे चुंचाळे रस्त्यावर खळे असून या खळ्यात त्यांचा 15 हजार रुपये किंमतीचा बैल बांधला होता. हा बैल चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले व यावल पोलीस ठाण्यात रामदास पाटील यांनी धाव घेत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

