वरणगावातील चोरट्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त

रावेर पोलिसांची कारवाई : कारवाईने वाहनधारकांमधून समाधान


Nine stolen bikes seized from a thief in Varangaon रावेर : रावेर पोलिसांनी वरणगाव येथील अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. जितेंद्र नारायण सोनवणे (32, रा.रामपेठ वरणगाव, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दुचाकी चोरीचे गुन्हे उघड
शुक्रवार, 5 जुलै रोजी बंडू महाजन (45, रा.तामसवाडी, ता.रावेर) यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.के.5236) ही बँक ऑफ बडोदा, बर्‍हाणपूर रोड भागातून चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. रावेर पोलिसांनी तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे जितेंद्र नारायण सोनवणे (32, रा.रामपेठ वरणगाव, जि.जळगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून महाजन यांची दुचाकी (एम.एच.19 डी.के.5236 तसेच स्प्लेंडर प्रो व बजाज कंपनीच्या प्लॅटीना मिळून एकूण नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने वाहनांचे नंबरप्लेट बदलल्याने चेसीस क्रमांकाद्वारे आता वाहन मालकाचा शोध घेण्यात येत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुरेश मेढे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील आणि महेश मोगरे यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !