भुसावळात अवैधरित्या गॅस रिफिलिंग : 10 गॅस सिलिंडर जप्त


Illegal gas refilling in Bhusawal: 10 gas cylinders seized भुसावळ  : शहरातील वर्दळीच्या जामनेर रोडवरील मुख्य स्टेट बँकेच्या मागील राजू ऑटो केअरमध्ये अनधिकृतरीत्या घरगुती गॅसचे वाहनांमध्ये रिफिलिंग केले जात असल्याची माहिती भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास छापेमारी करीत दहा गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारी मोटार असा एकूण 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयीत शाहरुख कादर खाटीक (अयान कॉलनी, भुसावळ) विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे घरगुती वापराचे सिलिंडर हे अनधिकृतरित्या रिक्षा तसेच वाहनांमध्ये रिफिल केले जात असल्याची माहिती तहसीलदार निता लबडे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांना सोबत घेत सोमवारी दुपारी दिड वाजता छापेमारी केली. यावेळी एका रिक्षेत अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग होत असताना वाहन चालकाने धूम ठोकली. यावेळी पथकाने एचपी कंपनीचे नऊ भरलेले तसेच एक अर्धे भरलेले सिलिंडर, वजनकाटा, इलेक्ट्रीक मोटार व गॅस रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी रात्री उशिरा नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून शाहरूख खाटीक विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !